मुंबई - वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस कस्टडीमध्ये मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही आमदार नवाब मलिक यांनी केली