बंडाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर गेलो नाही तर तुरुंगात टाकतील, असं शिंदे त्यावेळी म्हणाले होते. आदित्य ठाकरेंनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलले ते खरं आहे, असं राऊत म्हणाले.