दिल्लीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही नेत्याची उपस्थिती नव्हती. यावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. बैठकीतील गैरहजेरीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा आहे, असाही प्रश्न शरद पवारांना यावेळी विचारण्यात आला.