अन् शरद पवारांनी शंकरराव चव्हाणांकडे खातं बदलून मागितलं
"माझ्या आयुष्यात शिक्षण खातं एकदम अवघड खात होतं. मी वसंतरावांकडे विनंती करून ते बदलून घेतलं. तर, शंकरराव चव्हाण आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला शिक्षण खात सोडून कोणतंही द्या," असा किस्सा शरद पवारांनी हात जोडून औरंगाबादेतील कार्यक्रमात बोलताना सांगितला