राज्यात पुन्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर व तालुक्यातील शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी गेले होते. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील शेतकरी सिताबाई सुरवसे यांच्या दोन एकरच्या बागेला गारपीटीचा फटका बसला असून ३० लाखांचं नुकसान झालं आहे. या बागेची पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला दिलासा दिला आहे. यावेळी व्यथा मांडताना शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते.