मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. समृद्धी महामार्ग अतिशय कमी कालावधीत होतो, मग कोकणातील रस्ता का नाही? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी गडकरींना विचारला.