महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'बॅनर वॉर' पाहायला मिळत आहे. उर्दू भाषेत बॅनर लागले म्हणून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना एकमेकांना कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. मालेगावात उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेमध्ये बॅनर लागले, ज्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या इतर नेत्यांनी देखील ठाकरे गटावर सडकून टीका केली. यानंतर ठाकरे गटाने देखील एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे असे काही बॅनर्स दाखवले. त्यामुळे बोट फक्त ठाकरेंवरच का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. शिवाय उर्दू भाषेवरून एवढं राजकारण तापण्यामागे कारण काय असा सवालही उपस्थित होतो आहे. जाणून घ्या याबाबतचा HW मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Trending #BJP #Urdu #Malegaon #Shivsena #BannerWar #AmbadasDanve #SanjayRaut #Rally #UrduBanner #SheetalMhatre #JitendraAwhad #NCP #NareshMhaske #Language #Politics #MarathiNews #Maharashtra