"मराठीत एक म्हण आहे, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघितल्या तर असेच काहीसे होतेय कि काय अशी शंका येते.
झालेय काय तर प्रकाश आंबेडकर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मागील आठवड्यात युती जाहीर करून ""आमचं ठरलाय"" अशी कबुली दिली. मुंबईतल्या BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हि युती ठाकरेंसाठी फार महत्त्वाची मानली जातेय. पण त्यांच्या या नव्या युतीमुळे जुन्या युतीमध्ये मात्र आता खटके उडताना दिसतायत. वरकरणी जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीला ठाकरेंच्या नव्या युतीचे स्वागत केलं असले तरी प्रकाश आंबेडकरांचा वंचित पक्ष महाविकास आघाडीतला चौथा पक्ष होणार कि नाही यावर मात्र काही एकमत होत नाहीये . त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांसोबत आपलं जुना भांडण आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट केलय. तर दुसरीकडे शरद पवारांनीसुद्धा याबद्दल महाविकास आघाडीत काही चर्चा झाली नाहीये असं स्पष्ट केलय.
पण महाविकास आघाडीतील या भांडणाचा फायदा भाजपला होतोय का? कि हे भांडण फक्त एक दिखावा आहे आणि खरी खेळी काहीतरी वेगळीच आहे?
आज या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती घेऊया.
#UddhavThackeray #PrakashAmbedkar #SharadPawar #MVA #Shivsena #VanchitBahujanAghadi #NCP #Congress #BJP #PMModi #GautamAdani #HWNews