महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये रोज गोंधळ पाहायला मिळत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP #Nagpur #WinterSession #ChandrashekharBawankule #AbdulSattar #PhoneTapping #Maharashtra #HWNews