महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज चौथ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी “योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आमचे कर्तव्य आहे”, असे जाहीरपणे सांगितले. या मुद्द्याला हात घालून आव्हाड म्हणाले की, भाजपाला सनातन धर्म परत आणायचाआव्हाड यांच्या टीप्पणीवर भाजपा आमदार राम सातपुते चांगलेच संतापले. त्यांनी आव्हाड यांना उत्तर देत असताना म्हटले की, 'मी दलित असल्याचा मला अभिमान आहे. होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मला आरक्षण दिले. त्यामुळेच मी विधानसभेत आमदार म्हणून निवडून येऊ शकलो. त्याला मला अभिमान आहे' असे म्हणत संतापलेले पाहायला मिळाले.