छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. स्वराज्य रक्षक ही उपाधी त्यांच्या नावापुढे लावण्यात आली आणि तिच योग्य आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून उमटणारे पडसाद थांबताना दिसत नाहीत. तोच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं' असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटण्याची चिन्हं आहेत.