Chinchwad Byelection: पोटनिवडणुकीची तयारी काय? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Lok Satta 2023-02-25

Views 3

Chinchwad Byelection: पोटनिवडणुकीची तयारी काय? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलिस देखील सज्ज झाले आहेत. चिंचवड मतदारसंघातील ५१० मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ३५२ पोलीस अधिकारी, कर्मचारी, २७५ होमगार्ड, ५ निमलष्करी दल आणि एक एसआरपीएफची तुकडी असणार आहे. ५१० पैकी १३ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. याविषयी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी लोकसत्ताचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी संवाद साधला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS