'चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना' हे गीत सध्या सोशाल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारं आणि उद्धव ठाकरे यांच्या वेदना मांडणारं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. रत्नागिरीतील विकास लांबोरे या कवीने ही गीत लिहिलेलं आणि गायलेलं आहे.