चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केला, असा गंभीर आरोप सचिन भोसले यांनी केला आहे. हल्ल्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सचिन भोसले यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.