'आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही' असे विधान एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केले. 'या एकनाथ शिंदेने कधी कोणाचं काही घेतलं नाही' असे वक्तव्य करत बाळासाहेबांचे विचार महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.