पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. 'शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे दोन दिवसाच्या सरकारसाठी ते पाठिंबा देतील यावर विश्वास बसण्यासारखा नाही. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा उचलण्यासाठी या सगळ्या विषयाची चर्चा होत आहे' अशी प्रतिक्रिया कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी फडणविसांच्या गौप्यस्फोटावर दिली.