कसब्यातील आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एका महिन्यातच कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून मनसे नेते वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारची कानउघडणी केली आहे. वसंत मोरे फेसबुक पोस्ट केली आहे, यात मोरे म्हणाले की, "माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या सरणाची राख अजून शांत झाली नसेल. पण तुम्हाला मात्र तुमच्या मतांची चिंता. त्यामुळे लगेच पोटनिवडणुका लावल्या" असं म्हणत वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुका कधी घेणार? अशी विचारणा केली आहे.
#RajThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #MNS #VasantMore #BJP #Shivsena #NanaPatole #Congress #BalasahebThorat #RahulGandhi #AtulLondhe #Kasba #Chinchwad #Maharashtra