देशभरात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र, याच मंडप उभारण्यावरुन एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबादेवी परिसरात गणेश उत्सवासाठी मंडप उभारण्याच्या कारणावरून भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलेला मारहाण करत असलेल्या व्यक्तीचे नाव विनोद अरगिले असे असून तो मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे.
#MNS #RajThackeray #Mumbadevi #Ganeshotsav #MNSViralVideo #Hitting #ViralVideo #Maharashtra #HWNews