पदवीधर-शिक्षक विभागाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. नागपूरची जागाही काँग्रेसने जिंकली. मात्र या यशाने महाविकास आघाडीने हुरळून जाण्याचं कारण नाही, असा इशारा पुण्याचे पालमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासनेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.