वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
#PrakashAmbedkar #SanjayRaut #SharadPawar #UddhavThackeray #VBA #VanchitBahujanAghadi #NCP #MVA #Maharashtra #ShivSena #Alliance