भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केले यावर शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर टीका केली, 'जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित हे किती शिल्लत राहिले आहेत? जम्मू काश्मीर हे खुप लांब राहिलं आहे आता जरा आपलं घर सांभाळा.पहिले तुम्ही राजीनामा द्या. निवडुन या मग जम्मू काश्मीरपर्यंत पोहचा. बाळासाहेबांनी जो वट वृक्ष बनवला त्या वृक्षाला राष्ट्रवादीचे कलम लागतील' अशी टीका गायकवाडांनी केली.