'दुर्दैवाने आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. पूर्वीच्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमांत शिकवायचं ठरवलं त्यामुळे आम्ही शिकलो पण आमच्यात कधीच तसा न्यूनगंड निर्माण झाला नाही. नंतरच्या काळात पालकांच्या मनात उलटा विचार यायला लागला इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे असा प्रवाह तयार झाल्याने त्याची चलती आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच द्यायला हवं' , असे विधान ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी केले. नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील पदर्पणाच्या कार्यक्रमात आळेकर बोलत होते.