राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील दीक्षाभूमी येथे भेट दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केलं. ते गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तकही झाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "दीक्षाभूमीसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही पवित्र भूमी आहे. सरकार कुठेही कमी पडणार नाही. आम्ही दोघे येथे आहोत."
"सुरुवातीला दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा दिला होता. आता तीर्थक्षेत्राचाही अ दर्जा दिला आहे," अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.