नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन विशेष चर्चेत आहे. अधिवेशनात भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी लावून धरली. या आंदोलनाचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.