छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे