'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले आहे." असं विधान लेखक विश्वास पाटील यांनी केलं होतं आता त्याला उत्तर अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. कोल्हे म्हणाले की, 'जी मालिका २०२०मध्येच संपली तिचं मार्केटिंग मी आता का करेल? पण ते ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर मी टीका करणार नाही. ती माझी संस्कृती नाही. त्यांनाही मी नाटकाचे निमंत्रण देतो'