कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न अजून चिघळला असून आता याचे पडसाद पुण्यातही पाहायला मिळत आहे.पुण्यातील स्वारगेट एस.टी स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी नारायण टॉकीज जवळील सना पार्क येथे उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसला ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.तर भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविण्यात आला.