शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. प्रदर्शित होताच हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘पठाण’च्या या गाण्यावरून वाद सुरु असतानाच यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(रिपोर्टर:सागर कासार)
.