शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटालाच मिळणार, असा विश्वास कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मुलाला व आपल्याला राजकारणातून संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं असा आरोप कदम यांनी केला.