कोकण महोत्सवात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दलच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेध करताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली.'भाजपाने शिवाजी महाराजांचा अपमान करायची सुपारी उचलली आहे का?' असा सवालही मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.'शिवरायांच्या अपमान झाला तर यांना आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही' असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.