कांदा, कापूस, हरभरा उत्पादक शेतऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात कापूस आणि कांद्याची माळ घालून आंदोलन देखील करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर आगपाखड केली आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं कांद्याचा तोरण हे सरकारच्या मरणाचं तोरण आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.