आळंदीत अष्टगंध लावणाऱ्या मुलीला सोन्याचे मंगळसूत्र सापडले. पूजा भामरेला हे मंगळसूत्र सापडले आणि तीने ते पोलिसांना सुपूर्द केले. अष्टगंध लावुन एक एक रुपया कमवणाऱ्या पूजाने प्रामाणिकपणे हे मंगळसूत्र पोलिसांना दिले. पोलिसांनी या प्रामाणिकपणाचे कौतुक करत शाबासकीची थाप तीच्या पाठीवर दिली.