कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाल्याने किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे. कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.