भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्जाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ५ अधिकृत आणि १ अपक्ष अशा ६ जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार आहे, असंही ते म्हणाले.