मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. 'रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का?', असं ते म्हणाले होते. याला उत्तर देत किशोरी पेडणेकरांनी 'अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेता करणार का?', असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय महिलांचं अशाप्रकारे हणन होत असेल तर पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचं देखील पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.