शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आरोपींच्या मूलभूत हक्कांचा हवाला दिला आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्याकडे या प्रकरणी स्वत: लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेना आणि महविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.