महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं असं मत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, यावरून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.