प्रा. सुरेश पुरी महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारिता आणि जनसंपर्काच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे चालते-बोलते विद्यापीठ, सांभाळकर्ते. एक शिक्षक काय करू शकतो? त्या शिक्षकाभोवती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वलय किती मोठे असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरी सर. विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख असणारे सुरेश पुरी सर आज सेवानिवृत्त असले तरी त्यांचं विद्यार्थ्यांना उभे करायचे काम अजूनही अविरतपणे सुरूच आहे. आपल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, अनेक शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांची सातत्याने काळजी घेण्याचा जणू वासाच पुरी सर यांना जडला आहे. पुरी सर महाराष्ट्रातल्या पत्रकारितेशी संबंधित असणाऱ्या जुन्या आणि नव्या विद्यार्थ्यांचे केंद्रबिंदू म्हणून आजही तितक्याच उत्साहाने सेवानिवृत्तीनंतरही जोमाने काम करीत आहेत. पुरी सरांचा प्रवास सुरू होतो लातूरवरून, पुढे पुढे आणि आज सुद्धा पुरी सर आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आहेत. पुरी सर यांचा थक्क करणारा प्रवास या ‘सक्सेस पासवर्ड’च्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी ‘सक्सेस पासवर्ड’ या शोच्या माध्यमातून प्रा. सुरेश पुरी सर यांची घेतलेली ही मुलाखत, त्यांचा एकूणच जीवनप्रवास उलगडणारा आहे. चला तर मग पाहूया मग ‘सक्सेस पासवर्ड’ विथ संदीप काळे यांच्यासोबत.