Success Password With Sandip Kale | Dr. Baban Jogdand | Sakal Media |

Sakal 2022-04-23

Views 5

डॉ. बबन जोगदंड जनसंपर्कातून वेगळे विश्व केलेले मोठं नाव. उत्तम लेखक, अनेक पदव्या घेऊन नवीन रेकॉर्ड करणारे. 'यशदा' च्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये नवीन शिकण्याच्या संदर्भातली ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे. संमेलन परिषदा सेवाभावी चळवळी आणि या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण सार्थकी लावणारे अशी ओळख बबन जोगदंड यांची आहे. एक गाव कुसातला मुलगा ज्याला शहराचं नाव ही माहीत नाही. तो मुलगा पुण्यासारख्या शहरांमध्ये येऊन अवघ्या देशाच्या जनसंपर्कात आपलं नाव कोरतो. अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करतो. जोगदंड यांनी उभं केलेलं काम नवतरुणांनी आदर्श म्हणून घ्यावं असंच आहे. आपलं कुटुंब आपले मित्र आपले समविचारी असणारे अनेक बुद्धिमान व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी या सगळ्यांची मोट बांधून सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांनी घेतलेला पुढाकार हा नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे.

आज ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमात सकाळचे संपादक संदीप काळे यांनी डॉ. बबन जाऊन जोगदंड यांचा सगळा प्रवास आपल्यासमोर ठेवला आहे. त्या प्रवासाच्या माध्यमातून नव्या पिढीला नवीन काही तरी शिकायला मिळेल. विशेषतः ज्यांनी ग्रामीण भागात राहून मोठं होण्याचं स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नाला यामुळे निश्चित भरारी मिळणार आहे. चला तर मग सहभागी होऊ या संदीप काळे यांच्या सोबत सक्सेस पासवर्ड या खास शो मध्ये.

⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'

Share This Video


Download

  
Report form