पंडित राठोड महाराष्ट्रातल्या अनेक गरीब व होतकरू युवकांना आधार देणारा एक आधारवड. केवळ बंजारा समाज नाही तर, महाराष्ट्रातल्या पीडित असणाऱ्या, उपेक्षित असणाऱ्या अनेक जाती धर्मातल्या लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा एक कार्यकर्तृत्वाने युवक. राज्याच्या विकासात तरुणाई हा मोठा घटक आहे. हा घटक सजग, डोळस व्हावा यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे पंडित राठोड आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपल्या सामाजिक कामामुळे पोहोचले आहेत. आर्थिकधोरण आणि समाजकारण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजूला सक्षमपणे पेलण्यासाठी तरुणाई पुढे आली पाहिजे, या उदात्त हेतूतून तरुणांना जागं करण्याचं मोठं काम पंडित राठोड यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केले. आज 'सक्सेस पासवर्ड' या खास कार्यक्रमांमध्ये पंडित राठोड यांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेल्या वेगळ्या सामाजिक कामाचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी पंडित राठोड यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या खास शोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणला आहे. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड' विथ संदीप काळे.