जळगाव जिल्हयात 31 मे रोजी संध्याकाळी रावेर यावल आणि चोपड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यामुळे स्थानिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर केळी पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर तालुक्यातील माचला येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यामुळे केळीचे घड जमिनीवर आडवे झाले आहेत. या शेतकऱ्यांचं 16 जुन 2020 मध्ये सुद्धा वादळामुळे नुकसान झालेलं. मात्र त्यावेळची भरपाई देखील अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनं नाराजी व्यक्त केलीये.
#Jalgaon #Rain #BananaFarmer #Farmer #RakshaKhadse #Cyclone #ChandrakantPatil #Shetkari #HeavyRain #Bananas #Plantation #Maharashtra