महिला व बालविकास विभागामार्फत बुलढाणा जिल्हात अनुसूचित जाती जमातीच्या गर्भवती स्त्रियांना शासनाकडून बाळंतविडा व खजूर पाकीट देण्यात आले. प्रत्येक लाभार्थीला 200 ग्रॅमचे खजूर पाकीट 12 तर काही ठिकाणी 11 पाकिटे वितरित करण्यात यावे असे आदेश असताना सुद्धा नांदुरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये मात्र या खजूर पाकीट 11 वितरित करणे गरजेचे होते. मात्र लाभार्थ्यांला फक्त 7 पाकिटे देण्यात आले. त्यामुळे इतर पाकिटे गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.