Pune News | पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याचे आदेश | Sakal Media
मुंबई उच्च न्यायालयानं पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिलेत. याची अंमलबजावणी सुरु झाल्यास पुणे महापालिकेवरील आर्थिक बोजा हा वर्षाला २०० कोटींनी वाढण्याचा अंदाज आहे.
२३ गावांची याघडीची लोकसंख्या जवळपास ८ लाखाच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी प्रत्येकी ५५ लीटर पाणी देण्याचं ठरल्यास या २३ गावांसाठी एका दिवसाला तब्बल ४,४०० टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल.