आयएनएस विक्रांतच्या नावे कोट्यावधी रुपये माजी सैनिक व सर्वसामान्य नागरीकांकडून गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप करत शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले. उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करत निषेध आंदोलन करण्यात आले.