अहमदनगर येथून जोशी परिवार हे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी औरंगाबाद इथे आले होते. अंत्यविधी आटपून गावाकडे परतत असताना साडेतीनच्या दरम्यान औरंगाबाद येथील वाळुज परिक्षेत्रात गाडीच्या इंजिन मधून अचानक धूर आला. गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि गाडीतील प्रवाशांना सुखरूप सुरक्षित ठिकाणी बाजूला नेले. धूर येत असलेल्या इंजिनची पहाणी करत असतांना गाडीचे आगीच्या ज्वाळात रूपांतर झाले आणि काही मिनीटात गाडी क्षणार्धात जळून भस्मसात झाली.
#aurangabad #car #accident #fire