मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली असून या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग इतकी मोठी आहे की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.