साताऱ्यातील पाटण येथे एका माणसाने बायकोसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून स्वतःच्या घराला आग लावण्याचा प्रकार घडला आहे. या आगीत शेजारच्या नऊ घरांनीही पेट घेतला. या आगीत दहा घरांमधील सर्व उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोकड, शेतीची अवजारे इत्यादी जाळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.