हे तुम्ही जे पाहताय आणि ऐकताय ते आहे बीड जिल्ह्यातलं आहे. नाशिक जिल्ह्याल्या द्राक्ष बागा आणि पश्चिम महाराष्ट्रातली बहरलेली बागायती शेती तुम्ही पाहिली असेल. पण आष्टी तालुक्यातल्या आंधळेवाडीच्या या शेतकऱ्यानं जे करून दाखवलंय ते थक्क करणारं आहे. एकूण ३६ जणांचं कुटुंब आणि दीडशे एकर शेतीतून या शेतकऱ्याने जिल्ह्यातील एक प्रगत शेतकरी म्हणून ओळख मिळवलीय. सरकारच्या विविध योजनांचा फायदा आणि त्याला मेहनतीची जोड या बळावर आंधळे कुटुंबाने कोरड्याठाक आष्टी तालुक्यात अक्षरशः नंदनवन फुलवलंय. हे करण्यापूर्वी त्यांनी समस्येच्या मुळावरच घाव घातला, ते म्हणजे सर्वात अगोदर नियोजन केलं ते म्हणजे पाण्याचं...आंधळे बंधूंना एकूण दीडशे एकर शेती आहे. पण त्यात ७५ एकरात त्यांची बागायती आहे, ज्यात फळशेती आणि भाजीपाला त्यांनी पिकवलाय. पाण्याचं योग्य नियोजन करुन त्यांनी द्राक्ष आणि ढोबळी मिरची पिकवलीय, जी त्यांच्या उत्पन्नाचं एक मोठं माध्यम बनलीय. कारण, बीडचा हे शेतकरी देशातल्या अनेक बाजारपेठेत माल पोहोचवतोय.