Marathi Actor's Son Debut ‘...बनवाबनवी’मधील या अभिनेत्याच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण

Lokmat Filmy 2022-01-29

Views 1

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेते अशोक सराफ यांचा अशी ही बनवाबनवी हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या सिनेमात लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ यांच्या भूमिका अर्थातच बऱ्याच गाजल्या. पण या सिनेमातील आणखी एका कलाकाराची भूमिकाही गाजली ती म्हणजे शंतनू ही भूमिका. शंतनूची भूमिका सिदार्थ रे यांनी साकारली होती. सिद्धार्थ यांनी २००४ साली वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यानंतर आता त्यांची मुलं सिनेसृष्टीत आपलं नाव बनवू पाहत आहेत. सिद्धार्थ रे यांचा धाकटा मुलगा शिष्या हा आता लेखक म्हणून आपल्या भेटीला येत आहे. लवकरच कबीर खुराणा दिग्दर्शित ड्रामायामा ही शॉर्टफिल्म प्रदर्शित होणार आहे. आणि या शॉर्टफिल्मची पटकथा शिष्याने लिहिली आहे. याबाबतची एक पोस्ट शिष्याची आई अभिनेत्री शांतीप्रिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलीये. ट्विट करत त्यांनी म्हंटलयं की, sooo sooooo proud of you my little one Shishya ..... A self made story in the making with BIG DREAMS & little steps…. Stay blessed always...LOVE AMMA.... “ . या शॉर्टफिल्ममध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिची लेक रिनी सेन आणि तारे जमीन पर फेम अभिनेता दर्शिल सफारी असणार आहेत... (Snehal VO) Marathi Actor Siddharth Ray's Son Debut

#LaxmikantBerde #AshokSaraf #AshiHiBanwaBanwi

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS