पुण्यात मोबाईल चोरट्यांची दहशत वाढताना दिसतेय. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट आढळून येतोय. बसस्थानक, भाजी मंडई, शॉपिंग मॉल्स, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून नागरिकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
२०२१ या वर्षात पुण्यात तब्बल २९,५१५ मोबाईल चोरी ला गेले. यातील ४९९ मोबाईल परत मिळाले असल्याची माहिती वार्षिक अहवालातून समोर आली आहे. २०२० साली २२,९४३ लोकांचे मोबाईल चोरीला गेले होते. २०१९ साली हाच आकडा २० हजारापेक्षा कमी होता.